Ganam
Zen Tatvadnyan By Sanjay Kaptan
Zen Tatvadnyan By Sanjay Kaptan
Couldn't load pickup availability
झेन तत्त्वज्ञानाचा उगम भारतात झाला असला तरी, त्या लहानशा ओढ्याचा विशाल प्रवाह मात्र चीन, जपान व कोरियासारख्या देशांत विकसित झाला, हे लक्षात घेतले पाहिजे. या पौर्वात्त्य तत्त्वज्ञानाचा मनःस्नेही प्रकाश पाश्चिमात्त्य लोकांनादेखील प्रसन्न करणारा वाटला. त्यांनी तो व्यक्तिगत व संघटनात्मक आयुष्यात आचरणात आणला, हे विशेष!
द्वेष, ईर्ष्या, हाव, मोह, लोभ आणि अकारण गर्व या सर्वांमुळे आपण स्वतःचे खरे स्वरूप विसरतो. ज्ञानाच्या व विवेकाच्या सामर्थ्याने अज्ञानाचा पराभव करता येतो, हे झेनचे व्यवहार्य आणि प्रभावी सूत्र आहे. स्वतःला ओळखा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःवर प्रथम विजय मिळवा, ही झेन तत्त्वज्ञानाची मूलतत्त्वे आहेत. ती जीवनाच्या सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना सारखीच लागू पडणारी आहेत.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.