Ganam
ZADACHE GUPIT ANI ITAR KATHA by DR.SANJAY DHOLE
ZADACHE GUPIT ANI ITAR KATHA by DR.SANJAY DHOLE
Couldn't load pickup availability
राजू आमचा आहे हुशार. विज्ञानाची त्याला आवड फार. कनसाई गावाची तो आहे शान. रनाळ्यातील एका गूढ डोंगरावर राजू चुलत भावंडांसह गेला असताना तो एका विवरात पडला; पण त्या जीवघेण्या विवराचं रहस्य उलगडलं राजूनी. एकदा रानात गेलेल्या मंग्याचा झाला मृत्यू. त्याचा छडा लावण्यासाठी रानात गेलेल्या राजूला दिसलं एक अद्भुत झाड. राजूने मग त्या झाडाचं आणि मंग्याच्या मृत्यूचंही उलगडलं कोडं. आष्ट्याला गेलेला असताना एका रात्री राजूला सापडली उल्का. त्याने मग त्याच्या पद्धतीने निरसली तिच्याबाबतची शंका. लेंडा-गेंडा ही हरवली बैलजोडी. राजूने रानात जाऊन थरारक पद्धतीने ती शोधली. अशा या राजूच्या करामती. त्याला विज्ञानाची आहे संगती. त्याचा आयुकातील शास्त्रज्ञ किरणमामा आणि विज्ञान क्षेत्रातील, पोलीस खात्यातील मंडळी नेहमीच उभी त्याच्या पाठीशी. गूढ वातावरणातून उलगडणारं विज्ञान, त्याच्या जोडीला रंगीत चित्रं छान. राजूची ही हुशारी आणि मानवता, आवडेल खास आमच्या कुमार दोस्तांना.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.