Ganam
Yogya Nirnay Kase Ghyave By : Dr. Vijay Agrawal
Yogya Nirnay Kase Ghyave By : Dr. Vijay Agrawal
Couldn't load pickup availability
डॉ. विजय अग्रवाल यांनी केंद्रीय सेवेत विविध वरिष्ठ पदांवर विविध ठिकाणी काम केले आहे. माजी राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांचे खासगी सचिव म्हणून 10 वर्षे त्यांनी काम केले होते. आपल्या अनुभवातून त्यांनी योग्य निर्णय कसे घ्यायचे, याबद्दल मार्गदर्शन केले आहे. अयशस्वी आणि यशस्वी माणसांमध्ये एकच फरक असतो, तो म्हणजे निर्णय घेण्याचा. चुकीचा निर्णय सगळे काही बिघडवतो. हा निर्णय योग्य वेळी कसा घ्यायचा आणि अचूक कसा घ्यायचा, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. अचूक निर्णय घ्यायची कार्यपद्धती असते तीच ते इथे सांगतात. विद्या अंबिके आणि आशा कवठेकर यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा चांगला अनुवाद केल आहे.
यशस्वी आणि अयशस्वी व्यक्तींमध्ये ङ्गरक असतो तो ङ्गक्त निर्णयाचा. यशस्वी व्यक्ती आपल्या जीवनातील अधिकतर निर्णय योग्य घेते तर अयशस्वी व्यक्तीचे बहुतेक निर्णय चुकीचे सिद्ध होतात. हेच कारण आहे, की ज्यामुळे बरेच लोक कठोर मेहनत करूनही हव्या त्या गोष्टी प्राप्त करू शकत नाहीत. हे पुस्तक यश आणि अपयशातील नेमके हेच अंतर मिटवते. हे पुस्तक खासकरून अशा लोकांसाठी लिहिले आहे. * जे नेहमी यशस्वी बनू इच्छितात. * जे कठीण आणि संघर्षमय काळात ही विजेता म्हणून पुढे जाऊ इच्छितात. * जे आपल्या चुकीच्या निर्णयांद्वारे स्वतःच्या यशाचे रहस्य शोधू इच्छितात. * जे निर्णय घ्यायला घाबरतात. एकूणच हे पुस्तक त्या लोकांसाठी आहे ज्यांना यशाचा रस्ता ओळखून त्यावर वाटचाल करण्याची इच्छा आहे
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.