Skip to product information
1 of 1

bookganga

Vivaswan Suryadev | विवस्वान सूर्यदेव By Pratik kokil | प्रतिक कोकिळ

Vivaswan Suryadev | विवस्वान सूर्यदेव By Pratik kokil | प्रतिक कोकिळ

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

अंधाराचा अंत करण्यासाठी
साध्या शस्त्रांची नव्हे,
तर ‘ब्रह्मतेजाची’ गरज असते...

जेव्हा स्वर्गाची सुवर्ण कवाडे असुरांच्या पायाखाली तुटली, जेव्हा देव स्वतःच्या अस्तित्वासाठी मृत्यूलोकी भटकू लागले आणि जेव्हा संपूर्ण ब्रह्मांड अधर्माच्या काळोखात बुडाले, तेव्हा एका मातेच्या अगतिक अश्रूंमधून एक महाप्रकाशाचा
संकल्प जन्मला.

हा प्रवास आहे ‘मार्तंडाचा’जो एका मृतवत भासणाऱ्या
अंड्यातून अथांग जलाच्या काळोखाशी झुंजत बाहेर आला. हा प्रवास आहे ‘विवस्वानचा’ज्याने आकाशात झेप घेऊन
असुरांच्या मायेला जाळून भस्म केले आणि हा प्रवास आहे
एका पित्याचाज्याने स्वतःच्या कुटुंबाच्या आनंदासाठी
स्वतःच्या तेजाचा त्याग केला.

आपण ज्या सूर्याच्या प्रकाशात रोज आपलं जग शोधतो,
त्या सूर्याच्या संघर्षांची ही गाथा आपल्याला कधीच का सांगितली गेली नाही? ज्याच्यामुळे आपण श्वास घेतो, तो ‘ग्रहाधिपती’ स्वतःच्या घरात सुरू असलेल्या संज्ञा आणि छायेच्या युद्धात कसा होरपळला? न्यायाची देवता शनिदेव आणि मृत्यूचा अधिपती यमराज यांचा उगम नक्की कसा झाला?

हे केवळ एक काल्पनिक पुस्तक नाही, तर तो आपल्यातील
‘तेजाचा’ शोध आहे. ‘मार्तंड ते सूर्यदेव’ ही एका पराक्रमी
देवतेची थक्क करणारी महागाथा!

आयुष्यात कितीही मोठा अंधार असला,
तरी उद्याचा उदय अटळ असतो...
हाच विश्वास देणारा एक अजोड प्रवास!

विवस्वान-सूर्यदेव... एका महाप्रवासाची गाथा!

View full details