Skip to product information
1 of 1

Ganam

Vittya Sakasharata v Adhunik Banking By Avinash Kulkarni

Vittya Sakasharata v Adhunik Banking By Avinash Kulkarni

Regular price Rs. 130.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 130.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

"आज २१ व्या शतकाच्या तिसर्‍या दशकात मोबाईल फोन आणि त्याचा वापर हा लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला असल्याचे चित्र आहे. या फोनचा आणि त्यामध्ये असलेल्या आंतरजालाचा (इंटरनेटचा) वापर करून वापरकर्त्यास अनेक प्रकारच्या माहितीची उपलब्धता होते आहे. त्याचबरोबर त्याचे आर्थिक व्यवहारही आता या फोनवरील उपलब्ध संकेतस्थळांच्यामार्फत बोटाच्या टिचकीवर होऊ लागले आहेत. वित्तीय आणि बँकिंग क्षेत्रातील ह्या क्रांतीकारी बदलामुळे आधुनिक बँकिंग सेवा-सुविधेच्या स्वरुपात खूप मोठा बदल घडून आला आहे.

बँकिंगच्या बदलत्या स्वरुपाची ओळख सर्वसामान्य लोकांना व्हावी यासाठी ह्यापुस्तकामध्ये गतकालीन बँकिंग सेवा-सुविधांची थोडक्यात माहिती दिली आहे. तर बदल्यात काळानुरुप आणि बदलत्या आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानावर आधारीत बँकिंगच्या सेवा-सुविधांची माहितीसुद्धा यापुस्तकात करून देण्यात आली आहे. 

बँकिंग आणि वित्तीय सेवांचे स्वरुप कोणतेही असो काही प्रसंगी बँकिंग सेवांच्या उपलब्धतेमध्ये काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. काही प्रसंगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात फसवणूकही होण्याची शक्यता असते. त्यामुळे बँकिंग आणि वित्तीय साक्षरता महत्त्वाची आहे. त्याचबरोबर बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कोणत्या सुविधांची नेमकी आपणास गरज आहे हे सर्वसाधारण ग्राहकास समजले पाहिजे यासाठी यापुस्तकाचे प्रायोजन केले आहे. आज वेगवेगळ्या बँका आणि वित्तीय सेवा पुरविणार्‍या कंपन्यांचे वेगवगेळे अ‍ॅप-उपयोजित संकेतस्थळ सहजपणे उपलब्ध झाले आहे. परंतु ग्राहकाने आपली गरज ओळखून आणि वापरण्यास सहजता आणि सुरक्षितता तपासून अशा सुविधेचा वापर करणे योग्य ठरते.

वित्तीय साक्षरता यापुस्तकात आधुनिक बँकिंग व वित्तीय सेवा-सुविधांविषयीची आवश्यक ती सर्व माहिती दिलेली आहे. त्यामुळे हे पुस्तक शैक्षणिक म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तर उपयोगी आहेच, त्याचबरोबर हे पुस्तक सर्वसामान्य लोकांनासुद्धा उपयुक्त ठरणारे आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परिक्षा आणि नोकरीसाठीच्या परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनासुद्धा यापुस्तकातील मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे. "

View full details