Ganam
Vikha By Sarita Athavale
Vikha By Sarita Athavale
Couldn't load pickup availability
विळखा
स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजच्या जेन-झी पिढीच्या काळापर्यंत ७०-८० वर्षांच्या दीर्घ कालावधीत घडणारी रहस्यमय दीर्घकथा. कमालीच्या थंड डोक्याने खून करणारा कथानायक, चुकीच्या पद्धतीने उघड झालेल्या रहस्यामुळे स्वतःच्या आयुष्याची होळी करून घेणारी आई, खून झालेल्या वडिलांना न्याय मिळावा म्हणून जीव मुठीत धरून सर्व आयुष्य त्या खुन्याच्या सान्निध्यात घालवणारा मुलगा, ह्या सगळ्या कथेचा तोल सांभाळणारी सायकॉलॉजिस्ट कथानायिका आणि इतर अनेक पात्रे !
रस्ता थिजला
मतिमंद मुलीला सांभाळताना तिच्या आईची होणारी तारेवरची कसरत आणि जीवघेणी घालमेल नेमक्या प्रसंगातून मांडताना कथेचा ओघ कुठेही रेंगाळत नाही. कथेची मांडणी करताना उपनगरीय परिसर आणि मतिमंद मुलीचा विकास (?) ह्यांची अतिशय तरलपणे घातलेली सांगड कथेत प्रकर्षाने जाणवते. ह्यातील व्यथेचा अनुभव प्रत्यक्षात घ्यावा लागणाऱ्या मातांचे भावविश्वच ह्या कथेत उलगडले आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.