Ganam
Vajpayee By Abhishek Choudhary
Vajpayee By Abhishek Choudhary
Couldn't load pickup availability
या विलक्षण पकड घेणाऱ्या चरित्रात, अभिषेक चौधरी हे दाखवण्याचा प्रयत्न करतात, की भारताला हिंदुराष्ट्र करण्याच्या मोहिमेत वाजपेयीजींचे योगदान बहुतेक लोकांना वाटते त्यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण होते. लेखक स्पष्ट करतात, की वाजपेयींचे बालपण आणि तारुण्य याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. पण ते राजकारणात जसे वागले, तसे का वागले हे समजून घेण्यासाठी ती सुरुवातीची वर्षे खूप महत्त्वाची आहेत. मूलतः पुराणमतवादी असूनही ते अत्यंत जिज्ञासू आणि मनमिळाऊ, अलिप्त आणि तरीही मनोमन महत्त्वाकांक्षी असल्याचे दिसून येते. नवीन कागदपत्रे आणि मुलाखतींचा वापर करून चौधरींनी वाजपेयींच्या चरित्राचे सुस्पष्ट चित्र उभे केले आहे. त्यात गांधीहत्येच्या पार्श्वभूमीवर वाजपेयींनी गुप्तपणे केलेले कार्य, त्यांचा परराष्ट्र धोरणाबद्दल असलेला विलक्षण ध्यास, आई-वडिलांच्या एकापाठोपाठ झालेल्या अकाली मृत्यूंचा आघात, त्यांचे गुंतागुंतीचे खासगी आयुष्य, संयुक्त विधायक दल आकाराला येण्यातील महत्त्वाची भूमिका, संघ परिवाराची संसदेत केलेली पाठराखण ह्या सगळ्यांचा ऊहापोह केला आहे. असे करताना, हे उल्लेखनीय पुस्तक भारतीय राजकारणाबद्दल वारंवार सांगितल्या जाणाऱ्या अनेक दंतकथा आणि खोट्या कल्पनांना आव्हान देते. काँग्रेसमधील पुराणमतवादी आणि आरएसएसला पाठिंबा देणारे हिंदी विचारवंत, पटेलांची विस्तारित संदिग्धता, आज ना उद्या पूर्व पाकिस्तान भारतात विलीन होईल ही नेहरूंची जन्मजात आशा, जनसंघाची आर्थिक स्थिती आणि निवडणूक जिंकण्याची शक्यता यांवर इंदिरा गांधींनी निष्काळजीपणाने केलेला हल्ला, जयप्रकाश नारायणांची समग्र क्रांतीविषयीची अवास्तव स्वप्ने आणि संघ परिवाराची आणीबाणीतील संदिग्ध निर्भयता ह्याबद्दलचा आढावाही ह्या चरित्रात घेतल्याने भारतीय लोकशाहीतील गुंतागुंतीवर प्रकाश पडतो.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.