Skip to product information
1 of 1

Ganam

UPSC val Prem Collectar Sahiba bhag 2 By Kailash Manju Bishnoi

UPSC val Prem Collectar Sahiba bhag 2 By Kailash Manju Bishnoi

Regular price Rs. 217.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 217.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

पहिल्या भागात गिरीश आणि एंजल यांचं उतुंग प्रेम दिसत, तर हा दुसरा भाग एजल आयएएस झाल्यानंतर करियर आणि प्रेम यांच्यामध्ये तिची कशी दोलायमान अवस्था होते, ते सांगतो. तिच्यावर मनापासून प्रेम करणारा गिरीश आत्मसन्मान आणि प्रेमभावना यांच्या द्वंद्वात अडकतो. एंजल आपल्या स्वप्नांसाठी आपल्या प्रेमाला, गिरीशला सोडून देईल की मग त्यांचं प्रेम काळाच्या या कसोटीचा सामना करेल? हे जाणून घ्यायचं असेल, तर कलेक्टर साहिबा या कादंबरीचा हा दुसरा भाग वाचायलाच हवा.
कलेक्टर साहिबा २ मध्ये एंजल आणि गिरीश यांच्या विभिन्न दृष्टिकोनांमधून उभा राहणारा नात्यांमधला पेच आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षांमुळे उभा राहणारा संघर्ष आपल्याला वाचायला मिळतो. ही कादंबरी प्रेम, करियर आणि आत्मसन्मान यांच्यातील नाट्य अत्यंत सुंदरतेने विणते. त्याचबरोबर वाचकांना हा विचार करायला भाग पाडते की, प्रेम आणि करियर यांना एकाचवेळी न्याय देणं शक्य आहे का की, मग यापैकी एका गोष्टीचा त्याग करणं गरजेचं असतं.
कैलाश मांजू बिश्नोई यांचा जन्म राजस्थानमधील जोधपूर येथील लोहावट येथे झाला. लोहावट येथील सीनियर सेकंडरी स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जयनारायण व्यास विश्वविद्यालय, जोधपूर येथून त्यांनी पदवी प्राप्त केली. पदवी घेतल्यानंतर यूपीएससीची तयारी करताना त्यांनी हिंदी व इतिहास या विषयांत एम.ए. केलं आणि ते यूजीसी नेट/एआरएफ परीक्षाही उत्तीर्ण झाले. त्यांना लहानपणापासूनच खेळाबरोबरच अभ्यासाचीही आवड होती. दैनिक जागरणमध्ये त्यांचे 'ऊर्जा' आणि 'आजकल' है स्तंभछापून येऊ लागले. या स्तंभलेखनात प्रकाशित झालेले त्यांचे समकालीन आणि प्रेरणादायी लेख वाचकांमध्ये कमालीचे लोकप्रिय झाले आहेत. राष्ट्रीय स्तरावरील विविध वर्तमानपत्रांत आजवर त्यांचे ४०० हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी लिहिलेल्या कलेक्टर साहिबा या कादंबरीचा पहिला भागदेखील गाजला होता.

View full details