Ganam
NyurosarjarIcya paulakhuna By Jaydeva Panchawagh
NyurosarjarIcya paulakhuna By Jaydeva Panchawagh
मेंदू आणि त्याला जोडून असलेला मणका हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचे; तितकेच नाजूक अवयव. पण त्यांच्या आजारांबद्दल, त्यावरील उपचारांबद्दल आपल्याला फार कमी माहिती असते. याबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने प्रदीर्घ अनुभव असलेले न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. ते या पुस्तकातून मेंदू व मणक्याशी संबंधित आजार, त्यांची लक्षणं, कारणं आणि त्यावरील योग्य उपचार यांची ओळख सहजसोप्या भाषेत करून देतात.
पुस्तकातले काही महत्त्वाचे विषय –
ब्रेन ट्यूमर
चेहऱ्याची असह्य वेदना (ट्रायजेमिनल न्यूराल्जिया)
डोळा मारण्याचा आजार व त्यावरील उपचार वरदान ठरलेली एमव्हीडी शस्त्रक्रिया
एमआरआयचं तंत्रज्ञान
स्लिप डिस्क
मेंदूचं कामशास्त्र
साठीनंतरची मणक्याची शस्त्रक्रिया इत्यादी….
मेंदू आणि मणका यांची कार्य, त्यांचे आजार आणि त्यावरील शस्त्रक्रिया यांबद्दल तसेच त्या अनुषंगाने रंजक, उद्बोधक आणि उपयुक्त माहिती देणारं पुस्तक
न्यूरोसर्जरीच्या पाऊलखुणा….
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.