Ganam
Trimurti By Arun Shevate
Trimurti By Arun Shevate
Couldn't load pickup availability
आधुनिक भारताच्या शिल्पकार म्हणाव्यात अशा अनेक महनीय व्यक्ती असतील. पण महात्मा मोहनदास गांधी, पं. जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान विशेषत्वाने गणलं जातं.
म. गांधींनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला चालना तर दिलीच, पण त्याचबरोबर जनतेला नीतिमूल्यांचेही नवे पाठ घालून दिले.
पं. नेहरूंनी आधुनिक भारताची सर्वकष पायाभरणी केली, तर डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची विविधता लक्षात घेऊन राज्यघटना तयार केली. या तिघांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या कार्याचा पुस्तकात मागोवा घेतला आहे तो जाणकार अभ्यासकांनी.
म. गांधी : रामदास भटकळ, आभा गांधी, विनोद शिरसाठ
पं. नेहरू : मैथिलीशरण गुप्त, अंबरीश मिश्र, मुकुंद टाकसाळे
डॉ. आंबेडकर : किशोर मेढे (विविध पैलूंवर ३ लेख)
आधुनिक भारताच्या या तीन शिल्पकारांची, त्यांच्या वैशिष्ट्यांची, त्यांच्या योगदानाची नेमकेपणाने ओळख करून देणारं पुस्तक… त्रिमूर्ती.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.