Ganam
Tipu Sulatanache Swapna By Girish Karnad Uma Kurlkarni
Tipu Sulatanache Swapna By Girish Karnad Uma Kurlkarni
Couldn't load pickup availability
केवळ तलवारीच्या धारेवर राज्ये टिकत नसतात. त्यासाठी सुयोग्य नियोजन आणि प्रजाहिताचा विचार करणेही आवश्यक असते, असा विचार करणारा आणि इंग्रज सैन्याच्या राष्ट्रनिष्ठेने अचंबित झालेला, प्रगल्भ विचारांचा टिपू सुलतान या नाटकातून वाचकांना भेटतो.
भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त इंग्लंडच्या बी.बी.सी. अेडिओकरिता गिरीश कार्नाड यांनी हे नाटक लिहिले. मूळ इंग्रजीत लिहिलेल्या या नाटकाचा कन्नड भाषेतील पहिला प्रयोग टिपू सुलतानच्या दोनशेव्या स्मृति-दिनानिमित्त कर्नाटकातील ‘रंगायन’चे दिग्दर्शक बी. बसवलिंगय्या यांनी टिपूच्या राजधानीत, श्रीरंगपट्टणच्या ‘दरिया दौलत’समोर मोठ्या थाटामाटात सादर केला.
ऐतिहासिक नाट्यकृतीचा एक उत्तम नमुना एवढेच याचे महत्त्व नाही. एक उत्तम शासनकर्त्याच्या अंगी आवश्यक असणाऱ्या सर्व गुणांचा प्रत्यय यातून येतो.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.