Ganam
The Spy And The Traitor By Ben Macintyre
The Spy And The Traitor By Ben Macintyre
Couldn't load pickup availability
‘एका माणसाच्या धैर्याची विलक्षण कथा’
द टाइम्स, सप्ताहातील पुस्तक
1985 मध्ये केजीबीच्या लंडन स्टेशनचा प्रमुख कर्नल ओलेग गोर्डिएस्कीला
मॉस्कोमध्ये बोलावण्यात आले. जिवाची भीती बाळगत तो आला, कारण
गोर्डिएस्की ब्रिटिशांसाठी गुप्तपणे हेरगिरी करत होता आणि त्याला संशय होता
की त्याचे रशियन वरिष्ठ त्याच्या पाठीमागे लागले आहेत- आणि त्याचे बरोबर होते.
गोर्डिएस्कीच्या असामान्य हेरगिरीचा तपशील ‘द स्पाय अँड द ट्रेटर’ देते. त्याच्या
देशद्रोहाचा माग त्याला प्रश्नांना सामोरे जायला लावतो, अमली पदार्थ देऊन त्याची
मॉस्कोमध्ये चौकशी होते. सर्वांत अविश्वसनीय बाब म्हणजे त्याला जिवंत बाहेर
काढण्यासाठी केलेले अचंबित करणारे MI-6 चे ऑपरेशन. गोर्डिएस्कीच्या दुहेरी
जगण्याची आणि धाडसाची असामान्य कथा यामुळे शीतयुद्धाचा मार्ग कायमचा
कसा बदलला हे बेन मॅकेनटायर उघड करतात.
‘जर एखाद्या हेरकथा लेखकाने हे कादंबरीत आणले असते तर त्यावर कोणी
विश्वास ठेवला नसता. पण एकेक करत युक्तीयुक्तीने ते सर्व मॅकेनटायर यांच्या
पुस्तकात येते.’ फ्रेड्रिक फोरसाइथ
‘दुसऱ्या महायुद्धानंतरचा जगातील सर्वांत महत्त्वाचा हेर. कमालीचे पकड घेणारे.’ संडे टाइम्स
‘असामान्य. आत्तापर्यंतचे त्यांचे सर्वोत्तम पुस्तक.’ जॉन प्रेस्टन, इविनिंग स्टँडर्ड
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.