Ganam
The Library By Zoran Zivkovic, Nitin Rindhe
The Library By Zoran Zivkovic, Nitin Rindhe
Couldn't load pickup availability
'द लायब्ररी' या पुस्तकातल्या सर्व कथा पुस्तक या वस्तूभोवती फिरत असल्या तरी, शेवटच्या कथेचा नायक म्हणतो त्याप्रमाणे यातल्या प्रत्येक कथेची चव वेगळी आहे. या कथांमधली पात्रं पुस्तकं जमवणारी, वाचणारी, लिहिणारी आहेत. पण सर्व कथांचा खरा नायक आहे पुस्तक. पुस्तकंच या मानवी पात्रांवर वर्चस्व गाजवतात; त्यांच्या आयुष्यात प्रश्न निर्माण करतात. दैनंदिन सर्वसामान्य तर्कबद्ध जीवनातल्या पुस्तक नावाच्या वस्तूला झिवकोविच तर्कापलीकडच्या अद्भुत जगात नेतो. या जगात पुस्तकांना चव असते आणि लेखकांच्या शरीराला वेदनेचा गंध असतो; पुस्तक माणसाच्या अस्तित्वावर अतिक्रमण करतात किंवा मिटली की नाहीशी होतात. पुस्तक टिकवण्यासाठी कथानायकाला या अत्याधुनिक काळातही हस्तलिखित परंपरेकडे वळावं लागणं, किंवा जिवंतपणे मुळीच वाचन न करणाऱ्यांना नरकात 'वाचना'ची शिक्षा ठरवली जाणं- लेखकाने सध्याच्या समाजात पुस्तकाविषयी असलेल्या (अ)संवेदनशीलतेवर सूचक भाष्य केला आहे. या कथा सांगतात त्याहून सुचवतात कितीतरी अधिक. खेळकर आणि गंभीर, काव्यात्म आणि उपासात्मक अशा वैविध्यपूर्ण अनुभवांतून हे सुचवणं असतं..
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.