Ganam
The diary of a young Girl By Ank Frank meena shete
The diary of a young Girl By Ank Frank meena shete
द डायरी ऑफ यंग गर्ल - माझ्यासारख्या एखादीच्या दृष्टीनं रोजनिशी लिहिणं हा खरोखरच एक अतिशय विलक्षण अनुभव आहे. मी याआधी काहीच लिहिलेलं नाही फक्त म्हणूनच नव्हे, तर पुढे मला किंवा इतर कोणालाही तेरा वर्षांच्या शाळकरी मुलीच्या स्वप्नाळू चिंतनात स्वारस्य वाटणार नाही, म्हणून मला तसं वाटतं.'
अॅन फ्रँक, शनिवार, २० जून १९४२
'द डायरी ऑफ अ यंग गर्ल' हा एका लहान मुलीच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या महायुद्धावर टाकण्यात आलेला अपूर्व, हेलावून टाकणारा दृष्टिक्षेप आहे. अॅननं ज्या वेळी हे शब्द लिहिले होते, त्या वेळी अर्थातच आपण स्वप्नाळूपणे केलेलं हे चिंतन नाझींनी ज्यूंच्या केलेल्या सामुदायिक कत्तलींच्या दरम्यानच्या आयुष्याविषयीची माहिती देणारं प्राथमिक संसाधन ठरेल, हे तिला माहीत नव्हतं.
ॲन ही असामान्य, हुशार, विचारी कथाकार आहे आणि तिची रोजनिशी ही मनोरंजक आणि ल्याबरोबरच ऐतिहासिक दस्तऐवज म्हणूनही लक्षणीय आहे. या रोजनिशीतील घटना दहशतीची फक्त ओझरती झलक दाखवत असल्या, तरी त्यांच्यातून युद्धाच्या काळातील मानवी स्वभावाचं, नातेसंबंधांचं आणि आशेचं ठसठशीत चित्रण समोर येतं.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.