Ganam
The Buddha and The Badass By Vishen Lakhiani
The Buddha and The Badass By Vishen Lakhiani
तुमच्याकडे अविश्वसनीय, अद्वितीय अशी चैतन्यशक्ती आहे, हे कधी तुमच्या लक्षात आले आहे का? वस्तुस्थिती ही आहे की, तुम्हाला त्याचा पत्ताच नाहीये! तुम्ही तुमच्या आत खोलवर उतरा! स्वतःला जास्तीत जास्त जाणून घ्या! तुम्हाला तुमच्या आतील सर्वोच्च प्रेमाचा व क्षमतेचा शोध लागेल! पूर्ण प्रेमाने व क्षमतेनं स्वतःला आपल्या कार्यात झोकून द्या!
‘बुद्ध आणि बादास’
बुद्ध हा आध्यात्मिक गुरुचा आदर्श आहे. तुमच्यात जर आंतरिक जागरूकता व सजगता असेल, तर तुम्ही सहजतेने, कृपेने आणि प्रवाहीवृत्तीने यशस्वी व्हाल! बादास म्हणजे कामावर यशस्वी होण्याची गुप्त अध्यात्मिक कला! बादास हा चेंजमेकरचा आदर्श आहे. ही अशी व्यक्ती आहे, की ती जिथे जाईल तिथे बदल घडवते. ती सदैव अग्रगण्य स्थिती-गतीत असते.
बुद्ध आणि बादास हे दोन्ही आदिबंध एकत्र आले तर? तुमच्या जीवनात व व्यवसायात आमूलाग्र बदल होतील! तुम्हाला एक अलौकिक जीवनाचा अनुभव येईल. मग आनंद, सहजता, प्रेरणा आणि विपुलता यांच्या संमेलनातून यशवैभव केवळ तुमचे आणि तुमचेच असेल!
या अलौकिक प्रवासात प्रभुत्त्व, आनंद, स्वातंत्र्य, समाधान आणि शांतता संपादन करण्यासाठी तुम्ही सतत कर्ममग्न रहात, सतत पुढे पुढे जात राहिले पाहिजे.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.