Ganam
The bachalor of Arts By R K Narayan
The bachalor of Arts By R K Narayan
मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘गाइड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाइड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.
अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.
‘प्रेम’ या भावनेचा खर्या अर्थाने विचार करायला लावणारी ही कथा. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकणारा चंद्रन या कथेचा नायक. आर.के. नारायण यांनी प्रेमात आकंठ बुडालेला चंद्रन आणि प्रेमभंगानंतरचा भरकटत जाणारा चंद्रन हा विरोधाभास खूपच सुंदर रेखाटला आहे. ‘प्रेम म्हणजे काय?’ याचा साक्षात्कार करून देणार्या अनेक घटना व प्रसंग या कादंबरीत वाचायला मिळतील. अल्लड व स्वच्छंदी आयुष्य जगणारा हा नायक ‘प्रेम’ या मृगजळामागे धावतो, ती गोष्ट मिळत नाही तेव्हा विरक्त, संन्यासीही होतो. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे जिवंत व्यक्तिरेखा, आशयसंपन्न कथेचा गाभा आणि हळुवार व मार्मिक विनोदशैली हे सर्व या कादंबरीतही प्रत्ययास येते.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.