sadhana prakashan
Thaiman Changlavadache (Marathi) थैमान चंगळवादाचे By Achyut Godbole अच्युत गोडबोले
Thaiman Changlavadache (Marathi) थैमान चंगळवादाचे By Achyut Godbole अच्युत गोडबोले
Couldn't load pickup availability
वारसा समाजसुधारकांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा : विवेकाचा या राज्यव्यापी मोहिमेचा प्रारंभ 'वारसा समाजसुधारकांचा युवा संकल्प या परिषदेने' लातूर येथे २९ नोव्हेंबर २०१० रोजी (म. फुले स्मृतिदिन) होतो आहे. या परिषदेत महाराष्ट्र विवेकवाहिनी सहभागी आहे. त्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संगणकतज्ज्ञ श्री. अच्युत गोडबोले यांची ही पुस्तिका प्रकाशित करताना आनंद होत आहे. मानवी विवेकाला अंधश्रद्धेचे सनातन आव्हान आहे. ते लक्षात घ्यावेच, पण त्याबरोबरच आधुनिक काळात बेसुमार वाढता चंगळवाद यामुळेही तेवढेच गंभीर आव्हान उभे राहिले आहे. अधिक धोक्याची बाब म्हणजे, ही वाढती चंगळवादी प्रवृत्ती जीवन अधिकाधिक यशस्वीपणे जगण्याची खूण मानली जाऊ लागली आहे. पराकोटीची विषमता, नैसर्गिक संसाधनांची बेसुमार उधळपट्टी, फार मोठ्या अन्य मानवसमूहाबद्दल असंवेदनशीलता व बेपर्वाई यांवर ही जीवनपद्धती उभी आहे. ती पूर्णतः अविवेकी आहे. समाजसुधारकांच्या विचाराशीही संपूर्णपणे विसंगत आहे आणि अंतिमतः मानव व निसर्ग यांना घातकच आहे, विनाशाकडे नेणारी आहे. या वास्तवाचे डोळे खाडकन उघडणारे दर्शन ही पुस्तिका घडवेल आणि वाचणाऱ्या सर्वांना अंतर्मुख व कृतिप्रवण करेल असा विश्वास वाटतो. नरेंद्र दाभोलकर कार्याध्यक्ष, महाराष्ट्र विवेकवाहिनी
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.