Ganam
TELGI SCAM REPORTER CHI DIARY by SANJAY SINGH
TELGI SCAM REPORTER CHI DIARY by SANJAY SINGH
Couldn't load pickup availability
एका पत्रकाराच्या हाती एक रिपोर्ट लागतो. वरवर कंटाळवाणा वाटणारा हा अहवाल. पण त्याची ब्रेकिंग न्यूज होताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. असं काय असतं या अहवालात? हा अहवाल असतो, तेलगीच्या महाघोटाळ्याचा. एका रात्रीत डान्सबारमध्ये कोटभर रुपये उधळणारा तेलगी. त्याच रात्री सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर येतो. आणि तपास यंत्रणेचीही मती गुंग होते. राजकारण आणि प्रशासनातली बडी धेंडं त्याला सामील असल्याची चर्चा सुरू होते. एका मागोमाग नवनवी नावं गुंफली जातात. राजकारण, पोलीस, प्रशासन, माध्यमं आणि सामान्य जनता या सगळ्यांना हादरवून टाकणारा हा महाघोटाळा. बनावट स्टॅम्पच्या धंद्यातून त्यानं निर्माण केलेली एक समांतर यंत्रणा आणि त्याचे भयंकर परिणाम, हे सगळं नंतर उघड्यावर आलंच. भारतीय दंड संहितेनुसार त्याला शिक्षाही झाली. पण हा संपूर्ण घोटाळा आणि त्याचं शोधपत्रकारितेच्या अनुषंगाने एका पत्रकारानं धुमाकूळ उडवणारं केलेलं संशोधन यांची ही रोचक आणि आश्चर्यचकित करणारी कहाणी. जी सोनी ‘SCAM 2003 : THE TELGI STORY’ या मालिकेतून सिनेजगतातही धुमाकूळ घालत आहे."
Share
![TELGI SCAM REPORTER CHI DIARY by SANJAY SINGH](http://ganam.in/cdn/shop/files/3915.jpg?v=1697654260&width=1445)
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.