Skip to product information
1 of 1

Ganam

Teesari Kasam Aani Itar Katha By Madhukar Dharmapurikar

Teesari Kasam Aani Itar Katha By Madhukar Dharmapurikar

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 210.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

ज्येष्ठ हिंदी साहित्यिक फणीश्वरनाथ रेणु यांचे 

2021 हे जन्मशताब्दी वर्ष. 

त्यांच्या गाजलेल्या निवडक अशा आठ कथा आणि 

त्याविषयीच्या टिपणांचा हा संग्रह. 

लेखक-अनुवादक मधुकर धर्मापुरीकर यांनी सिद्ध केलेला.

 

फणीश्वरनाथ रेणु यांच्या साहित्याबद्दल हिंदीतल्या 

मान्यवर समीक्षकांचे हे काही अभिप्राय 

रेणु यांच्या लेखन वैशिष्ट्यांचे यथार्थ वर्णन करतात : 

मुन्शी प्रेमचंद यांच्या परंपरेचे उत्तराधिकारी म्हणून 

रेणु यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या गोष्टीवेल्हाळ शैलीमध्ये 

मातीचा गंध आणि लोकसंगीताचा प्रत्यय देणारी जुगलबंदी असते, जी वाचकांच्या मनावर एक अमीट अशी छाप सोडते.

- ऋत्विक राय

 

रेणु यांची एका शब्दात ओळख सांगायची झाल्यास 

असे म्हणता येईल की, ते हिंदी साहित्याचे ‘मृदंगी’ आहेत- लोकसंगीतात रमलेले मृदंगी. 

त्यांनी साहित्याच्या माध्यमातून संगीत प्रतिध्वनित केले.

- अवधेश प्रधान

View full details