Ganam
TAWAIFNAMA by SABA DEWAN
TAWAIFNAMA by SABA DEWAN
म्हटलं तर त्या मनस्वी कलाकार. साधनेचा सोस बाळगून कलेवर हुकूमत गाजवणाऱ्या रागरागिणी. पण काळओघात त्यांचं अवमूल्यन होत गेलं. एका समृद्ध परंपरेला नैतिकानैतिकतेच्या संकोची चौकटीत बसवलं गेलं. आणि अभिजात संगीत आणि नृत्यातल्या या सम्राज्ञी काळाच्या उदरात नामशेष होत गेल्या. हा प्रदीर्घ आणि जीवाला चटका लावणारा प्रवास सबा दिवाण लिखित ‘तवायफनामा’ पुस्तकातून वाचकांच्या भेटीस येतो. ज्यात बनारस आणि भभुआतल्या तवायफ कुटुंबाचा तब्बल शतकाहून अधिक काळाचा पट समोर येतो. १८५७च्या उठावात प्राणांची बाजी लावणाऱ्या धरमनबीबीपासून सदाबहार, गुलशन, उमराव, तीमा ते अलीकडच्या काळातील हिंदू-मुस्लिम तिढ्यात हकनाक वेदना सहन करणाऱ्या तवायफांच्या जगण्याचा आलेख पहायला मिळतो. शमादानच्या मंद उजेडासारख्याच यांच्या कथा अस्वस्थ करत राहतात आणि यातल्या पानागणिक ठुमरीचे आर्त स्वर खोल जखम करत राहतात.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.