Ganam
Takachi Modi Patre By Bhaswati Soman, Mandar Lawate
Takachi Modi Patre By Bhaswati Soman, Mandar Lawate
Couldn't load pickup availability
टाकाची मोडी पत्रे हे पुस्तक श्री. मंदार लवाटे व सौ. भास्वती सोमण यांनी लिहिलेले आहे. इंग्रज येण्यापूर्वी आपल्याकडे बोरूने लेखन केले जाई. इंग्रज काळात बांबूच्या कामटीला नीफ लावून ते लिखाणासाठी वापरले जाऊ लागले. पण त्यामुळे अक्षरवाटिका(font) लहान झाली. इंग्रजी काळाच्या सुरवातीला टाकाने लेखन सुरु झाले. खरेदीपत्र, गहाणखत, भाडेचिट्ठी, जन्म मृत्यू दाखले, जमिनीच्या नोंदी, राखूळ चिट्ठी अशा प्रकारचे हे कागद असतात. सुवाच्च नसलेले टाकाने लिहिलेले हे अक्षर वाचणे सरावाने जमते.
पेशवेकालीन मोडी, शिव तसेच शिव पूर्वकालीन मोडी याचबरोबर टाकाने केलेले लिखाण मोडी वाचकास वाचता येणे गरजेचे असते. हे पुस्तक या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. या पुस्तकात मूळ मोडी पत्राबरोबर त्याचे लिप्यंतर दिलेले आहे. तसेच आवश्यक तिथे पत्राखाली संक्षिप्त-लघुरूपांची दीर्घरूपे दिली आहेत.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.