Ganam
Swaramohan Hariprasad Chaurasiya By Satya Saran, Neeta Kulkarni
Swaramohan Hariprasad Chaurasiya By Satya Saran, Neeta Kulkarni
Couldn't load pickup availability
विशिष्ट प्रकारचा बांबू, हवा आणि मानवाची इच्छाशक्ती अशा त्रिवेणी संगमातून ज्या काही ध्वनिलहरी निर्माण होतात, त्या सुखद चित्तशांतीचे तरंग उमटवतात… तर असं हे साधं सरळ वाद्य ! त्या वाद्याला हरिप्रसाद चौरसियांसारख्या सर्जनशील, सर्वस्व झोकून देणाऱ्या सिद्धीप्राप्त कलाकाराने आपलंसं केलं तर अद्भुत म्हणावं असं संगीत निर्माण होतं… आणि ही विलक्षण अनुभूती संगीतरसिक गेली अनेक दशकं घेत आहेत.
या पुस्तकात सत्या सरन यांनी हरीजींच्या सुरुवातीपासूनच्या प्रवासाचा आढावा घेतला आहे. म्हणजे पहिलवानगिरीचा आखाडा ते संगीताच्या ध्यासासाठी केलेली बंडखोरी, संगीताचं वेड ते बासरीवादनातील प्रभुत्व; सुरुवातीचे रेडिओ स्टेशनचे दिवस ते चित्रपट क्षेत्रातील मुशाफिरी; अन्नपूर्णादेवींकडचं शिष्यत्व ते शास्त्रीय संगीत वादनावरचं निर्विवाद प्रभुत्व; आंतरराष्ट्रीय संगीतातला सहभाग ते ‘गुरुकुल’ची स्थापना असा व्यापक पट रंजकतेने आपल्यापुढे उलगडत जातो आणि सोबत त्यांचं व्यक्तिमत्त्वही उलगडत जातं.
सत्या सरनसारख्या सिद्धहस्त लेखिकेने हरीजी आणि त्यांचं कुटुंब यांच्यासोबतच्या संवादातून साकारलेलं अधिकृत चरित्र…
स्वरमोहन हरिप्रसाद चौरसिया
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.