Ganam
Swarabhishek By Nikhil Vidyadhar Panditrao
Swarabhishek By Nikhil Vidyadhar Panditrao
Couldn't load pickup availability
उद्योग, चित्रकला, चित्रपट क्षेत्रांबरोबरच कोल्हापूरची संगीत परंपराही समृद्ध आहे. तिचा आढावा घेणारा बीजलेख वाचताना शास्त्रीय संगीतामधील कोल्हापूरच्या योगदानाचा पटही उलगडतो. बंदिशींच्या सौंदर्याचा आस्वाद घेता घेता संगीत विचारही अलगदपणे मनात उतरतो. गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित मधुसूदन कानेटकर, डॉ. वसंतराव देशपांडे यांच्याशी असलेले गुरुबंध सांगितले आहेतच. शिवाय विविध घराण्यांची सौंदर्यमूल्ये, त्यांची वाटचाल आणि सांगीतिक वैशिष्ट्यांसह गायकीची स्वतंत्र शैली निर्माण करणाऱ्या दिग्गजांचा प्रवासही अनवट आणि तितकाच प्रेरणादायी आहे. शास्त्रीय संगीताच्या प्रसारात आकाशवाणीच्या योगदानाची नोंद घेतली आहेच. तसेच विविध मैफलींचे रंगतदार अंतरंगही उलगडले आहे. पुस्तकातील लेखांच्या शेवटी अविस्मरणीय मैफली अनुभवण्यासाठी दिलेला ‘क्यूआर कोड’ रसिकांना दृक-श्राव्य स्वराभिषेकाने नक्कीच चिंब करेल.
चला, तर मग या स्वराभिषेकाचा दुहेरी अनुभव घेऊ या.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.