Ganam
Sulabha Ramyan By Raja Mangalvedhkar
Sulabha Ramyan By Raja Mangalvedhkar
भारतात युगानुयुगे सांगितल्या जाणाऱ्या रामकथेचे दोन पैलू आहेत. ती भक्तिभावाने ऐकणारे लोक रामायणातल्या सगळ्या आदर्शांची पूजा करतात; त्याच वेळी लहानग्यांना मात्र रामाचे शौर्य, भरताचे बंधुप्रेम, हनुमानाची दास्यभक्ति, बिभीषणाचा धीरोदात्तपणा या आणि अशा आचरणात आणण्यायोग्य अनेक गुणांचा ठेवा रंजकतेने अनुभवायला मिळतो.
समोर येणाऱ्या सुखदु:खांचा, कसोटी पाहणाऱ्या कठीण प्रसंगांचा सामना करताना बरेचदा वाट सापडत नाही. अशा वेळी एकवचनी, एकबाणी, मर्यादापुरुषोत्तम रामाची भक्ती आपले दु:ख दूर करण्याचे बळ देते. लहानपणापासून जर असे आदर्श समोर असतील, तर कुठल्याही प्रकारचा पेच सोडवण्यासाठी कशा पद्धतीने विचार करायला लागेल याची गुरुकिल्लीच गवसते.
म्हणूनच जोवर माणूस आहे आणि त्याला वाणी व भाषा आहे, तोवर रामायण आहे!
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.