Ganam
Sudha Murthy By Prashant Narayan Kulkarni
Sudha Murthy By Prashant Narayan Kulkarni
Couldn't load pickup availability
ज्या क्षेत्रात यापूर्वी एकाही स्त्रीने प्रवेश केला नव्हता, त्या अभियांत्रिकी क्षेत्रात जाऊन यशस्वी वाटचाल करणे. पुढे एक मोठा उद्योगसमूह उभा करणे. स्वतःची प्रगती करत असतानाच आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या विचाराने अनेक सामाजिक कार्यांसाठी वाहून घेणे. गरीब व पीडितांचे अश्रू पुसणे. आणि या सामाजिक कार्याचा वसा चालवत असतानाच आपल्या अनुभवविश्वातून दर्जेदार साहित्य निर्माण करणे; अशाप्रकारे विविधांगी कामांमुळे सुधा मूर्ती या तमाम भारतीयांसाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी लक्षवेधी ठरल्या आहेत.
एका छोट्याशा गावात जन्माला आलेल्या या मुलीने सळसळत्या उत्साहाने आणि स्वयंप्रज्ञेने उत्तुंग यश मिळवले. सुधा मूर्ती म्हणजे इंद्रधनुष्याचा शोभिवंत चत्मकारच होय. एक सिद्धहस्त लेखिका, आयटी क्षेत्रातील अतुलनिय योगदान, यशस्वी उद्योजिका, महान समाजसेविका, आदर्श माता महिलांच्या हक्कासाठी लढणारी रणरागिणी असे कितीतरी गुण असलेले हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होय. एका छोट्या गावातील सुधा ते राज्यसभेत खासदार म्हणून भाषण करताना सर्वाना अचंबित करणाऱ्या समाजसेविका 'सुधा मूर्ती' यांचा संपूर्ण जीवनप्रवास अक्षरशः थक्क करणारा आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.