Ganam
Stillness is the Key By Royan Holiday
Stillness is the Key By Royan Holiday
Couldn't load pickup availability
रोजचे जगणे हे अधिकाधिक कठीण व ताण-तणावग्रस्त होत चालले आहे. सततची अस्थिरता, अधांतरीपण तसेच क्षूद्र चिंता व ताण यामुळे आपण विलक्षण त्रस्त झालो आहोत. या त्रस्ततेकडून लेखक आपल्याला नीरव शांततेकडे घेऊन जातो. मुख्य म्हणजे रायन हॉलिडे यांनी प्राच्य आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा मोठा मिलाफ प्रस्तुत पुस्तकातून घडवून आणला आहे. वर्तमानाच्या या क्षणातले जगणे रायन हॉलिडे अधोरेखित करतो.’ - रॉबर्ट ग्रीन ‘मास्टरी’ या ग्रंथाचा लेखक ‘काही लेखक फक्त उपदेश करतात. रायन हॉलिडे शहाणपणाचा अर्क आपल्या तळहातावर ठेवतो. प्रत्येकाने, अगदी प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवे!’ - काल न्यूर्पोट ‘डिजिटल मिनिमलिझम’चा लेखक ‘आजच्या काळातील अत्यंत प्रगल्भ आणि परिपक्व व समजूतदार मनाचा लेखक आहे. हा लेखक तुमच्या ऊर्जेला, तुमच्यातील शुद्ध-सद्भावी मनाला आवाहन करीत शांततेकडे नेतो.’ - जॉन गार्डन, बेस्टसेलिंग ‘द् एनर्जी बस’चा लेखक
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.