Ganam
So Good They Can"t Ignore You By Sanyogita Dhamdhere
So Good They Can"t Ignore You By Sanyogita Dhamdhere
‘तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा’ हा सल्ला करिअर निवडीसाठी घातक आहे. त्याऐवजी तुम्ही काय करायला हवं हे ओळखा....
‘सो गुड दे कान्ट इग्नोर यू’ या पुस्तकात कॅल न्यूपोर्ट लोक जे काम करतात तेच त्यांना का आवडू लागतं या प्रश्नाच्या शोधात निघाला आहे. स्वत:च्या कामावर बेहद्द खुश असलेले सेंद्रिय शेतकरी, उद्यम भांडवलदार, पटकथा लेखक, मुक्तसंगणक प्रोग्रामर आणि इतरांना तो प्रत्यक्ष भेटला. ध्यासाचा पाठलाग करणं हीच कामातून समाधान मिळवण्याची गुरुकिल्ली आहे हे खूप पुराणं गृहीतक तो खोटं ठरवतो. प्रत्यक्ष जीवनातली उदाहरणं, अत्याधुनिक विज्ञान यातून बोध घेत, खात्रीने यशस्वी कारकीर्द घडवणार्या अधिक चांगल्या पर्यायी रणनीतीच्या तपशिलात तो जातो.
‘सो गुड दे कान्ट इग्नोर यू’ हे आपण कोणत्या क्षेत्रात करियर करावं याची धास्ती घेतलेल्या किंवा ‘तुम्हाला जे आवडतं ते काम करा, पैसा आपोआप त्याच्या मागे येईल’ अशा फुकाच्या सल्ल्याने त्रस्त झालेल्यांसाठी आहे.
‘तुम्हाला काय करावंसं वाटतंय याबद्दल काळजी करणं सोडून द्या. त्याऐवजी काहीतरी अर्थपूर्ण निर्माण करायला सुरुवात करा आणि ते जगाला अर्पण करा. कॅल या पुस्तकाद्वारे हेच आपल्याला सांगत आहे.’
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.