Ganam
SMILE PLEASE by SUPRIYA VAKIL
SMILE PLEASE by SUPRIYA VAKIL
आजूबाजूची माणसं, परिस्थिती, काळाच्या ओघात घडलेले बदल इ. बाबींवर खुसखुशीतपणे भाष्य करणारे लेख या लेखसंग्रहात आहेत. काही माणसं अशी असतात की त्यांनी काही वाचलं नाही, ऐकलं नाही. असं नसतंच मुळी. सगळंच माहीत असतं त्यांना. तर अशा व्यक्तीचं प्रातिनिधिक चित्र ‘सव्यसाची’ या लेखातून साकारलंय त्यांनी. तर काही विशिष्ट हेतूसाठी गळेपडूपणा करणार्या व्यक्तीचं प्रातिनिधिक चित्र रेखाटलंय ‘तुझ्या गळा...माझ्या गळा’ या लेखातून. पहाटे फिरायला गेलेल्या असताना एका कुत्र्याने रस्त्यात घातलेल्या गोंधळाचं रंगतदार चित्रण केलंय ‘दुम मचा ले...’ या लेखात. जाहिरातींच्या विश्वातल्या सदैव तरतरीत असणार्या बायकांचा खास शैलीत वेध घेतला आहे ‘नाहीतर आम्ही आहोतच’ या लेखात. तसेच खड्डेमय रस्ते, मेमरी ड्रॉइंग, मालिका व चित्रपटांमधील आजारपणं इ. विविध विषयांवरचे, अगदी साध्यासुध्या विषयांवरचे खुसखुशीत लेख आपल्या चेहर्यावर ‘स्माइल’ आणतात.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.