Ganam
Sir Isaac Newton te ligo By D Vy Jahangire
Sir Isaac Newton te ligo By D Vy Jahangire
Couldn't load pickup availability
गुरुत्वाकर्षण - विश्वातील सर्व वस्तुमानाला बांधून ठेवणारी शक्ती, असह्य बल. शास्त्रज्ञांना या बलाचं अस्तित्व समजलं होतं; पण प्रयोगाने ते दाखविता येत नव्हतं. आता, म्हणजे २०१६ साली प्रयोगाने ते सिद्ध करण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे. आपणाला गुरुत्वाकर्षण लहरी सापडल्या आहेत, दिसल्या आहेत. शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांचा हा लोभस परिपाक आहे. प्रयोग मानवी बुद्धिमत्ता, कष्ट, अचूकता या सर्वांचा संगम आहे. याची मनोवेधक कहाणी समजण्यासाठी शास्त्रीय जगतात, यासाठी भूतकाळात करण्यात आलेल्या प्रयत्नांची जाणीव असणे आवश्यक आहे. प्रस्तुत पुस्तकात ही माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. एका महान क्षेत्रात शास्त्रज्ञांनी केलेला हा उत्तुंग प्रवास आहे.
आर्यभट, केप्लर, न्यूटन, गॅलिलिओ, आइन्स्टाइन, हॉकिंग या महान गणितज्ञ, शास्त्रज्ञांनी केलेल्या अथक प्रयत्नांना आलेलं हे मधुर फळ आहे. हा सर्व इतिहास सुबोध, सुस्पष्ट तितकाच मनोरंजक करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. शास्त्रज्ञांची शास्त्रीय जाणीव, त्याबरोबरच त्यांचं मानवी रूप दाखविण्याचा प्रयत्न, एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा वाचकांवर उमटावा म्हणून प्रकर्षाने केला आहे.
हा प्रवास वाचकांना आवडो व पुस्तक पूर्ण वाचल्यानंतर मनात एकूणच शास्त्रीय जगताबद्दल, म्हणजेच पर्यायाने वैज्ञानिक दृष्टीबद्दल आदर निर्माण झाला, तर पुस्तक लिहिण्याच्या प्रवासाचे उत्तम फलित लेखकाला मिळेल.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.