Ganam
Silver Needle By Sumedh Vadawala (Risbud)
Silver Needle By Sumedh Vadawala (Risbud)
Couldn't load pickup availability
एस.यू.व्ही. मर्सिडीज बाहेर पार्क करून संजय हिरासकर डोंबिवलीच्या
स्मशानात गेले. परिचिताचा अंत्यविधी आटोपला. स्वच्छतागृहात जाऊ
लागले; पण आतल्या आवाजाने पावलं थबकली.
“काही वर्षांपूर्वी आमच्या पायांशी झुकत होता, पॅन्टीची मापं घ्यायला.
त्याने आता मर्सिडीजमधून फिरावं? काही काळे धंदे केल्याशिवाय का
पांढरी मर्सिडीज घेता आलीय?”
हिरासकर तसेच माघारी फिरले. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी शिवणकामाला
सुरुवात केली होती. साठी ओलांडण्यापूर्वी पर्यटनस्थळी स्वत:चं आलिशान हॉटेल
सुरू केलं. मधल्या वर्षांत इम्पोर्टेड कापडविक्री, दूधविक्री, ट्रान्सपोर्ट, जमीनविक्री,
सेकंड होम कन्स्ट्रक्शन अशा नाना व्यवसायांचे यशस्वी अनुभव घेताना लोकांना
जमीनदार करण्यात ते रमून गेले. डोंबिवलीतल्या बकाल चाळीत राहणारा
शिंप्याचा एक मुलगा डोंबिवलीतला पहिला मर्सिडीजवाला व्हावा, हे लोकांच्या
असूयेचं कारण ठरलं. वाइल्डलाइफ फोटोग्राफीचा छंद जपण्यासाठी त्याने
जगप्रवास करावा हे विस्मयाचं कारण ठरलं... कष्टांच्या बळावर कोणत्याही
वयात नव्याने व्यावसायिक होता येतं, सचोटीने श्रीमंत होता येतं याचा पुरावा
देणारी ही कहाणी तरुणांना आणि प्रौढांना कृतीप्रवण करेल.
Silver Needle | Sumedh Vadawala (Risbud)
सिल्व्हर नीड्ल । सुमेध वडावाला (रिसबूड)
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.