Skip to product information
1 of 1

saket prakashan

Shri Swami Samarth Jap Notebook 11000 श्री स्वामी समर्थ नाम जप वही 11000 By

Shri Swami Samarth Jap Notebook 11000 श्री स्वामी समर्थ नाम जप वही 11000 By

Regular price Rs. 150.00
Regular price Sale price Rs. 150.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

सुख, शांती आणि समृद्धीसाठी नामजप
।। श्री स्वामी समर्थ लिखित नामजप ।॥
नामजप लिहिताना अंगीकारावयाचे पवित्र नियम
* श्रीनाम लिहायला बसताना शक्यतो स्नान करून किंवा निदान हात-पाय, मुख प्रक्षालन करून स्वच्छतेने बसावे. (हे कठोर बंधन मानू नये, पण मन शुद्ध राहावे हीच अपेक्षा.)
* नामजप लिहिण्यासाठी लाल शाईचा पेन वापरावा, कारण लाल रंग हे प्रेम, भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक आहे.
* प्रत्येक पानावर १०८ वेळा श्री स्वामी समर्थ लिहावे. अर्धवट पान सोडू नये. प्रत्येक अक्षर लिहिताना मनोमनी श्रीस्वामींचे नाव उच्चारत राहावे. नामजप कुठल्याही भाषेत लिहिता येतो; मात्र भाव अंतःकरणातून यायला हवा.
* नामजपाची वही नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी.
* ही पवित्र वही कधी एकाने, तर कधी परिवारातील सर्वांनी मिळून पूर्ण करावी. यातून घराघरांत भक्तीचा सुगंध दरवळतो.
* नामजप पूर्ण झाल्यावर वही श्रीस्वामींना अर्पण करावी. तेव्हा भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नमः असे उच्चारून पूजन करावे.
* ही पावन वही देवघरात पूजेसाठी ठेवावी, जवळपासच्या स्वामी मठात अर्पण करावी किंवा वाहत्या नदी-समुद्रात भक्तिभावाने विसर्जित करावी.
* कुटुंबात सुतक वा वृद्धी असल्यास नामजप लिहू नये. नामजप लिहिताना मध्येच बोलणे टाळावे.
जपसंख्या हिशोब
प्रत्येक पानावर : 108 नामजप x एकूण पाने : 104 = अंतिम संख्या : 11,232 नामजप

View full details