saket prakashan
Shri Swami Samarth Charitra Saramrut श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत By by Vishnu Balwant Thorat विष्णू बळवंत थोरात
Shri Swami Samarth Charitra Saramrut श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत By by Vishnu Balwant Thorat विष्णू बळवंत थोरात
Couldn't load pickup availability
स्वामींच्या देदिप्यमान तेज धारण करणार्या स्वरूपात दिव्य सामर्थ्य आहे. स्वामींनी मानव देह धारण केल्यानंतर आणि भक्तांसाठी, पीडितांसाठी, गरीबासाठी चैतन्यरूपाने अनेक लीला केल्या. देहत्यागानंतरही ते आपल्या भक्तांसाठी संकळकाळात ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठिशी आहे’ असा धीर देऊन भक्तांच्या मार्गातील अडथळे दूर करतात. याचा प्रत्यय अनेक भक्तांना आला आहे. स्वामींनी म्हटलेच आहे, "जो अनन्य भावाने माझी सेवा करतो त्याचा योगक्षेम मी चालवितो.” आणि ही अनुभूती अनेक भक्तांनी घेतली आहे. ‘श्री स्वामी चरित्र सारामृत’ या ग्रंथाचे पारायण म्हणजेही स्वामींची एक सेवाच आहे. याची प्रतिती एकदा तरी ग्रंथ पारायण केल्यावरच येईल’ हे अनुभवावरून अनेक पारायणकर्ते सांगतात.
प्रत्येक अध्यायासोबत सुसंगत व मनोहारी चित्रांची जोड, अर्थपूर्ण व ओघवत्या भाषेतील कथासार, श्रद्धा दृढ करणारी फलश्रुती, जीवनाला योग्य दिशा देणारा गहन बोध आणि शास्त्रोक्त पारायणविधी‡या सर्वांचा समन्वय साधत हा ग्रंथ वाचनाला अधिक समृद्ध, प्रेरणादायी आणि आत्मिक समाधान देणारा ठरतो.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.