Ganam
Shreela Prabhupad By Hindol Sengupta, shuchita Nandapurkar- Phadake & Nayana Pikale (श्रील प्रभुपाद)
Shreela Prabhupad By Hindol Sengupta, shuchita Nandapurkar- Phadake & Nayana Pikale (श्रील प्रभुपाद)
Couldn't load pickup availability
'इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शसनेसची स्थापना कशी झाली, हे जाणून घेण्यासाठी संस्थेच्या आदरणीय संस्थापकाची कथा आपण जाणून घ्यायलाच हवी. हिन्दोल सेनगुमा यांनी ही उपयुक्त कया अतिशय सोप्या पद्धतीने सांगितली असून, त्या विलक्षण महात्याविषयी अधिक जाणून घ्यायची उत्सुकता असलेल्यांना ती सहज कळू शकेल. हिंदुत्वाला जागतिक पडद्यावर आणणारा एक अतिशय महत्त्वाचा क्षण नीट कळण्यासाठी या पुस्तकाची फार मदत होते. फ्रान्सिस एक्स, झूनी, एस. जे., पार्कमन प्रोफेसर ऑफ डिद्धिनिटी, हार्वर्ड युनिव्हर्सिटी. 'हिन्दोल यांनी आपल्या अनोख्या आणि आकर्षक पद्धतीने श्रील प्रभूपदांचे जीवन आणि भक्तीचा संदेश जिवंत केला आहे.' विवेक देब्रॉय, अर्थतज्ज्ञ आणि मुख्यमंत्री आर्थिक सागार मंडळ अध्यक्ष. 'त्यांचे कार्य, खासकरून भगवद्गीतेवरील त्यांची टीका जरी लोकप्रिय असली, तरी या अग्रणी हिंदू नेत्याचे जीवनकार्य मात्र बरेचसे दुर्लक्षित राहिले. हिन्दोल सेनगुप्ता यांनी हों कृष्ण चळवळी' च्या या संस्थापकाचे चरित्र लिहून ही पोकळी भरून काढली आहे. स्वपन दासगुभा, संसद सदस्य, राज्यसभा. " 'सिन्ग, डान्स अॅन्ड प्रे' मध्ये श्रील प्रभुपाद आणि 'इस्कॉन' या त्यांच्या निर्मितीची मनोवेधक कथा सांगितली आहे. हिन्दोल सेनगुप्ता यांचे लिखाण अतिशय ओघवते आणि अभ्यासपूर्ण आहे. अस्खलित शैलीत सांगितलेली लक्षवेधी कथा." शशी थरूर, संसद सदस्य थिरुवअनंगपूर लोकसभा, अध्यक्ष पार्लमेंट्री स्टॅडिंग कमिटी ऑन इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, अध्यक्ष-अखिल भारतीय प्रोफेशनल्स काँग्रेस.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.