Ganam
Shivrayanche Rajyprashansan By Dr.P.S.Jagatap
Shivrayanche Rajyprashansan By Dr.P.S.Jagatap
Regular price
Rs. 100.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 100.00
Unit price
/
per
‘शिवरायांचे राज्यप्रशासन' या ऐतिहासिक पुस्तकातून शिवराय हे मध्ययुगातील रयतेच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तम प्रशासन चालविणारे आदर्श राजे होते याची प्रचीती येते. जनकल्याणासाठी त्यांनी प्रत्येक कार्यात रयतेची गरज ओळखून प्रशासनामध्ये शिस्त, कर्तव्य तत्परता स्वातंत्र्य, समता प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक प्रशासनीक घटकाला निर्णय घेण्याचे अधिकार दिले असल्याचे प्रत्ययास येते. त्यात लष्कर, आरमार, व्यापार व उद्योग, बांधकाम, महसूल, न्याय व्यवस्था, पर्यावरण शेतीच्या सुधारणा, सैन्याची व आरमाराची कार्यपद्धती, गड किल्ल्यांचे संवर्धन इ. बाबतीत प्रशासकीय दृष्ट्या अमूलाग्र बदल घडवून आणले व त्यासाठी निरनिराळ्या कर प्रणालीतून राज्याचा आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते, सर्व प्रकारचा विकास व आर्थिक समृद्धी निर्माण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केल्याचे जाणवते. सुलभ वेतन यंत्रणा, जखमी सैनिकांचे पुनर्वसन, आपद्कालीन मदत योजना, युद्धकाळातील सुरक्षितता याबाबतीतही त्यांनी जनहितदक्षता घेतल्याचे अनुभवास येते. राज्यविस्तारासाठी फक्त युद्ध मोहिमा काढणे हे त्यांचे मुख्य उद्दीष्ट नव्हते पण ते करीत असताना सर्वसामान्य रयतेला आपल्या प्रशासनात समाविष्ट करून त्यांच्यात राज्य प्रशासनाविषयी आत्मविश्वास निर्माण करण्याची त्यांची भूमिका दिसून येते. यातून सर्वच क्षेत्रात उत्तम प्रशासकीय धोरणाची जनहितासाठी अम्मलबजावणी करणारा आदर्श राजा म्हणून शिवरायांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे वाचकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण होईल याची खात्री आहे
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.