Ganam
Shivrayanche Eknishta Mavle - Shiva Kashid v Bajiprabhu Deshpande By Prashant Kulkarni
Shivrayanche Eknishta Mavle - Shiva Kashid v Bajiprabhu Deshpande By Prashant Kulkarni
Couldn't load pickup availability
स्वराज्याच्या यज्ञात आहुती देण्यासाठी अनेक नरवीर हसत हसत पुढे आले. त्यामधील शिवा काशीद व बाजीप्रभू देशपांडे यांच्या सारख्या नरवीरांच्या बलिदानामुळे हिंदवी स्वराज्य राखले गेले. यांच्या जीवनचरित्राचा थोडक्यात आढावा या पुस्तकात घेतला आहे.
सहा फूटांपेक्षा जास्त उंची असलेले, भक्कम शरीराचे, पहाडासारखे बाजीप्रभू देशपांडे हे एक असाधारण व्यक्तीमत्व होते. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये होते, तसेच ते प्रशासनाच्या कामातही पारंगत होते.
शिवरायांसारखे दिसणारे, मध्यम उंचीचे, रंगाने गोरे, मजबूत शरीर असलेले शिवा काशीद यांचे व्यक्तीमत्व फारच प्रभावी होते. एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेले शिवा काशीद यांनी शिवरायांसाठी व स्वराज्यासाठी आपली आहुती दिली. इतिहासातील अनेक वीर कसे जगले ते सांगितले जाते मात्र 'शिवा काशीद' यांनी कसे बलिदान दिले हे पुढील हजारों वर्षे सांगितले जाईल; हीच तर शिवा काशीद यांची थोरवी आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.