Skip to product information
1 of 1

Ganam

Shivcharitra By Sir Jadunath Sarkar

Shivcharitra By Sir Jadunath Sarkar

Regular price Rs. 360.00
Regular price Rs. 399.00 Sale price Rs. 360.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्‌संकल्प करणारे महाप्रतापशाली रणधुरंधर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवरायांनी सर्व जाती-धर्मांच्या लोकांना संघटित करून मुत्सद्दीपणा आणि गनिमी कावा यांच्या साहाय्याने हिंदवी स्वराज्य उभारले. जनसामान्यांचा कैवार, उत्कृष्ट प्रशासन आणि गुणवंतांचा आदर ही शिवरायांच्या राज्यकारभाराची त्रिसूत्री होती.
मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलेल्या छत्रपती शिवाजीराजांच्या कर्तृत्वाचा मोठेपणा समजण्यास हे चरित्र अत्यंत उपयुक्त ठरेल.
हा युगपुरुष महाराष्ट्रदेशी अवतरला हे इथल्या रयतेचे भाग्य!
शिवराय अमर्याद क्षमता असणारे राज्यकर्ते होते. आपल्या या राष्ट्रांत एवढी थोर विधायक विभूती दुसरी झाली नाही, असे आपणांस दिसून येईल.
ग्रँट डफने मराठ्यांचा इतिहास लिहून एका शतकापेक्षा जास्त काळ लोटला. या कालावधीत शिवाजी महाराजांविषयीच्या प्रत्यक्ष माहितीची साधने अनेक भाषांत प्रसिद्ध झाली. त्या सगळ्यांचा सांगोपांग अभ्यास करून त्याचे विवेचन या शिवचरित्रात जदुनाथ सरकार करतात. सदर चरित्रात आधुनिक संशोधनाचा व विवेचक माहितीचा समावेश झाल्याने वाचकांना अनेक घटना व प्रसंग यांचा नव्याने उलगडा होईल.
आज राष्ट्रउभारणीसाठी देशातल्या प्रत्येक तरुणाने छत्रपतींच्या व्यूहनीतीचा साकल्याने विचार व अंगीकार करणे क्रमप्राप्त आहे.

View full details