Ganam
Shiva Chatrapati Swari Basaru By Abhishek Sunil Kumbhar
Shiva Chatrapati Swari Basaru By Abhishek Sunil Kumbhar
Couldn't load pickup availability
शिवछत्रपतींची एकमेव आरमार मोहीम*
'अफझलखानाचे पोट आणि शाहिस्तेखानाचे बोट' यात कुठेतरी हरवून गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अचाट, अफाट, अपरिचित आणि स्वतःच्या नेतृत्वात जाऊन केलेल्या एकमेव आरमारी मोहिमेच्या पराक्रमाची कहाणी म्हणजे 'स्वारी बसरूर'.
खाडीला जाऊन मिळणाऱ्या नदीत स्वतःच्या नौका उतरवणे हा रिवाजच या भूमीला कधी ठाऊक नव्हता, 'ज्याचे आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र इथे प्रस्थापित सर्व राजसत्तांना उमगत होते, परंतु तरीही या हिंदभूमीवर शतकांशतके राज्य करणाऱ्या एकाही सल्तनतीस स्वतःचे आरमार स्थापावे अशी दूरदृष्टी निर्माण झाली नाही.
इथल्या दर्यावर हुकुमत ती दूर देशांतून आलेल्या फिरंग्यांची... पण या साऱ्याऱ्यांच्या मानाने अगदी अलीकडेच उभे राहिलेले एक पोरसवदा वयाचे व्यक्तिमत्व काहीतरी दिव्य करते, स्वतःचे आरमार स्थापून, दर्याला खोगीर चढवत, स्वराज्यापासून शेकडो योजने दूर असलेल्या बसरूर या ठिकाणी आरमारी मोहीम काढत, तिचे स्वतः नेतृत्व करत छापा घालते हि गोष्ट काही साधी नाही. या पूर्ण स्वारीचा, छाप्याची ही पूर्ण कहाणी...
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.