Ganam
Shetkaryacha Aasud By Jotirao Phule
Shetkaryacha Aasud By Jotirao Phule
Couldn't load pickup availability
जोतीराव फुले यांनी ‘शेतकऱ्याचा असूड’ हे पुस्तक १८७३ मध्ये
लिहिले. आज इतक्या वर्षांनंतर आणि इतर अनेक संपादने उपलब्ध
असताना, त्या पुस्तकाचे आवर्जून नव्याने संपादन करण्याची गरज
काय, असा प्रश्न कोणाला पडू शकेल; पण थोडा विचार केल्यास
त्या प्रश्नाचे उत्तरही सापडू शकेल. ‘असूड’ लिहिला गेला त्या वेळी
देशातील शेतकऱ्यांची जी स्थिती होती, त्यापेक्षा आजही ती मूलतः
निराळी नाही. असलीच तर ती अधिकच बिघडली आहे, हे गेल्या
काही वर्षांत दीड लाख शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांवरून सहज
ध्यानात येऊ शकेल. या देशातील कोरडवाहू शेतकऱ्यांचे प्रश्न
आवर्जून सोडवले गेल्याखेरीज देशाला भवितव्य नाही, हे जोतीरावांचे
निदान आजही तितकेच यथार्थ आहे. तसेच ते प्रश्न सोडविण्याची
दिशा काय असू शकते, याचा जोतीरावांनी केलेला ऊहापोह
आजसुद्धा मार्गदर्शक ठरणार आहे. याचा अर्थ असा, की भारताला
स्वातंत्र्य मिळण्याच्या चौसष्ट वर्षांपूर्वी जोतीरावांनी या पुस्तकात जे
सांगितले होते ते आज स्वातंत्र्य मिळून चौसष्ट वर्षे उलटत
आल्यानंतरही तेव्हाइतकेच महत्त्वाचे आहे, एवढे एक कारणही त्या
पुस्तकाचे नव्याने संपादन करण्यासाठी पुरेसे आहे.
– भास्कर लक्ष्मण भोळ
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.