Ganam
Shetapasun Taataparyant By Gurudas Nulkar
Shetapasun Taataparyant By Gurudas Nulkar
Couldn't load pickup availability
"माझे ताट भरलेले असताना माझ्या अन्नदात्याचे ताट रिकामे का? हा प्रश्न प्रत्येक नागरिकाने समजवून घेतला पाहिजे. या गहन समस्येचे लेखकाने इथे विस्तृत विवेचन केले आहे. प्रश्नाचे सर्व पैलू सोप्या भाषेत मांडले आहेत. शेतीवरचे हे पुस्तक सर्वांनी आवर्जून वाचावे असे आहे!”
- डॉ. विजय केळकर, पद्मभूषण, केंद्रीय अर्थ खात्याचे माजी सचिव
"भारत आज ही कृषिप्रधान देश आहे. तेव्हा शेती आणि शेतकरी यांना समजावून घेणे हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. गुरुदास नूलकर यांचे हे पुस्तक या संदर्भात मोठे मोलाचे योगदान आहे. ‘शेतकर्याचा असूड’ या पुस्तकात महात्मा फुले यांनी आणि ‘गावगाडा’ या पुस्तकात त्रि. ना. आत्रे यांनी हा विषय पूर्वी मांडलेला आहे. तोच आता आधुनिक अर्थशास्त्रज्ञ-समाजशास्त्रज्ञ नूलकरांनी उत्तम मराठी भाषेतल्या या वाचनीय पुस्तकातून पुढे नेला आहे. अभिनंदन.”
- माधव गाडगीळ, ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ
"भारतीय शेतीचं स्वरुप आणि शेतीसंबंधी धोरणांचा इतिहास तसेच हरितक्रंतीचे फायदे-तोटे आणि नवउदारवादी धोरणांमुळे शेतीची झालेली अधोगती याविषयीचं अत्यंत सखोल विवेचन म्हणजे गुरूदास नूलकर यांचं हे पुस्तक होय. अतिशय साध्या, सोप्या भाषेत शेती आणि शेतकर्यांचे प्रश्न समजावून सांगणारं हे पुस्तक प्रत्येक भारतीयाने वाचायलाच हवं असं आहे.”
- अच्युत गोडबोले, सुप्रसिद्ध लेखक
"हवामान संकटाच्या अस्थिर काळात शेती करणं म्हणजे बॉम्बवर्षाव होत असलेल्या युद्धभूमीवर चालणं! गुरुदास नूलकर यांनी या शोचनीय अवस्थेचं अनेकांगी विश्लेषण करून ‘आपल्या ताटाला भरून काढणार्यांच्या ताटात काय असतं?’ हे समोर ठेवलं आहे. त्यांच्या उपेक्षित व अवमानित अवस्था समजून घेण्यासाठी हे पुस्तक वारंवार वाचले पाहिजे.”
- अतुल देऊळगावकर, पर्यावरण अभ्यासक, लेखक-पत्रकार
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.