Ganam
Shatataraka By Vasant Bapat
Shatataraka By Vasant Bapat
आकाशातील ‘शततारका’ नक्षत्राचे लखलखते तेज आणि सौंदर्य प्राप्त झालेल्या या वसंत बापट यांच्या निवडक कविता. ‘बिजली’, ‘सेतू’, ‘अकरावी दिशा’, ‘सकीना’, ‘तेजसी’, ‘राजसी’ आणि ‘रसिया’ या सात संग्रहांतून या कवितांची निवड केली आहे.
नक्षत्रातील प्रत्येक तारा स्वतंत्रपणे पाहू गेल्यास त्याचे तेज, सौंदर्य मनाला भावतेच शिवाय असे अनेक तेज:पुंज तारे एखाद्या नक्षत्रात एकत्रित आले की पाहणाऱ्याला अलौकिक सौंदर्याचे दर्शन घडवतात; त्याप्रमाणेच या संग्रहातील प्रत्येक कविता स्वयंपूर्ण सौंदर्याचा प्रत्यय तर देतेच परंतु संपूर्ण संग्रहातून वाचणाराला बापटांच्या वैविध्याने नटलेल्या प्रतिभेचा साक्षात्कार घडतो.
आपल्या कवितेतील नादमाधुर्य, आशयातील विविधता आणि जनमानसाला भावतील अशा विषयांवरील विपुल आणि तरीही कसदार काव्य यामुळे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचलेल्या आणि प्रिय ठरलेल्या काही मोजक्याच कवींमध्ये वसंत बापट यांचे नाव घेता येते. स्वातंत्र्यलढ्याच्या काळापासून कवितेशी नाते जोडणाऱ्या बापटांच्या बहुविध कवितेच्या विविधांगी सौंदर्याची झलक या संग्रहात अनुभवण्यास मिळेल.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.