Skip to product information
1 of 1

Ganam

Shastra katachi Kasoti By Dr Sanjeev Kulkarni

Shastra katachi Kasoti By Dr Sanjeev Kulkarni

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

निरीक्षण आणि चिकित्सक प्रयोगातून मिळालेली पद्धतशीर आणि तर्कसुसंगत माहिती म्हणजे विज्ञान. आणि निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि उपयोजन ही विचारशृंखला म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन, वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अंगीकार हा ऐच्छिक मामला नाही. भारतीय राज्यघटनेच्या कलम ५१ (अ) नुसार ठरवण्यात आलेल्या भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांत प्रत्येक भारतीयाने वैज्ञानिक दृष्टीकोनाचा स्वीकार करून चिकित्सक व सुधारक व्हावे असे म्हटले आहे.

 

प्रत्यक्षात आपल्याला आसपास काय दिसते? अंधानुकरण आणि गतानुगतिकता माणसाने आजही सोडलेली दिसत नाही. प्रश्न विचारणे म्हणजे औधात्य, चिकित्सा म्हणजे बंड, कारणमीमांसा म्हणजे अवज्ञा. समाजाच्या एका मोठ्या वर्गाचा विज्ञानाकडे बघण्याचा दृष्टीकोन फक्त उपेक्षापूर्णच नव्हे तर उपहासपूर्ण असलेला दिसतो. हे चित्र अस्वस्थ करणारे आहे.

 

विज्ञानाबाबत असलेली उदासीनता मानवाला विनाशाकडे नेते आहे. माणसाच्या स्वार्थीपणामुळे, बेदरकारी वृत्तीमुळे आणि हाताला लागेल ते ओरबाडून घेण्याच्या स्वभावामुळे आपल्या भवतालाचे, पर्यावरणाचे आणि पर्यायाने आपले अपरिमित नुकसान होत चालले आहे. विनाशाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मानवजातीला तारण्याचे सामर्थ्य फक्त विज्ञानाच्या हातात आहे...

 

'शास्त्रकाट्याची कसोटी' या विज्ञानकथासंग्रहातील कथा माणसाच्या मनात विज्ञानविवेकाचा उजेड पडावा या आशेतून लिहिलेल्या आहेत. 'करून तर बघू!' हे या संग्रहातील एका कथेचे नाव हीच या कथासंग्रहाच्या लेखनामागची प्रेरणा आहे.

View full details