Ganam
Shaniwar Raviwar By Satish Alekar
Shaniwar Raviwar By Satish Alekar
माणूस नेहमीच आपल्या वाट्याला आलेली दुःखाची पोकळी भरून काढण्यासाठी वेगवेगळे खेळ खेळत असतो. मुळात खेळ हा प्रकारच गुंतवून घेणारा असतो. त्या खेळात आनंद शोधून विरंगुळा करून घ्यायचा असतो.
शनिवार-रविवारच्या सुट्टीच्या दिवशी अपत्य नसलेले एक दाम्पत्य आपल्याला मूल नसल्याचे दुःख कवटाळत बसण्यापेक्षा वेगवेगळी पात्रे, प्रसंग, घटना ‘जन्माला’ घालतात आणि सुट्टीचा दिवस साजरा करतात. त्या आनंदाच्या भास-आभासाचा उत्सव म्हणजे ‘शनिवार रविवार’ हे नाटक !
ही गोष्ट जरी निपुत्रिक दाम्पत्याची असली तरी या नाटकाचा विषय फक्त त्या दाम्पत्यापुरता सीमित नाही. या नाटकातून नाटककाराला आणखी बरेच काही सुचवायचे आहे. माणूस हा दुःखापासून सदैव पळ काढण्याचाच प्रयत्न करत असतो. त्या दुःखातून सावरण्यासाठी आयुष्यभर वेगवेगळे खेळ खेळत असतो. त्या दुःखाची आणि खेळाची तऱ्हा तेवढी वेगवेगळी असते. त्याचा प्रभाव कधी दीर्घकाळ असतो, कधी-कधी क्षणभराचाही असतो. पण मूल नसल्याचे दुःख गोंजारण्यापेक्षा, सुट्टीच्या दिवशी त्यात अडकून पडण्यापेक्षा या नाटकाच्या माध्यमातून मानवी मनाचे लपंडाव अधोरेखित करण्यात आले आहेत.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.