Ganam
Sattar Tasanpurvee By Ayfer Tunc Shweta Pradhan
Sattar Tasanpurvee By Ayfer Tunc Shweta Pradhan
तुर्की भाषेतील लोकप्रिय लेखिका आयफर टंक यांच्या ‘येसी पेरी गेसेसी’ कादंबरीचा ‘सत्तर तासांपूर्वी…’ या श्वेता प्रधान यांनी केलेल्या अनुवादामधून एका वेगळ्या कालखंडाचा परिचय होतो. सूड आणि आत्मनाशाची ही कथा आहे. संपूर्ण कादंबरीत नायिकेला स्वतःचं नाव नाही. अप्रतिम सौंदर्य हे तिला मिळालेलं वरदान आणि तोच तिचा शाप. वयाच्या चाळिशीतही तितक्याच रूपवान दिसणाऱ्या या नायिकेशी आपली पहिली भेट तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकाराच्या – अलीच्या – घरी होते.
सत्तर तासांपूर्वी घडलेल्या क्रूर प्रसंगानंतर खचून हार न मानता, परिणामांची पूर्ण कल्पना असूनही भोगलेले भोग कादंबरीतील नायिका जगासमोर उघड करण्याचा निर्णय घेते. यात तिला यश मिळतं का? सत्तर तासांपूर्वी घडलेल्या त्या दुर्दैवी रात्रीचा रहस्यभेद करणं हा नायिकेच्या जीवनाचा शेवटचा अंक ठरतो का? तिला न्याय मिळतो का? मुळात, देशाला हादरवून सोडावं असं नायिकेच्या जीवनात सत्तर तासांपूर्वी काय घडलेलं असतं? या साऱ्या प्रश्नांची उकल कादंबरी वाचताना होत जाते.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.