Ganam
Saptrangi Palkhicha Bhoi By Bhartwaj
Saptrangi Palkhicha Bhoi By Bhartwaj
आपण लग्न का करतो? जोडीदाराची नक्की आवश्यकता का भासते? शारीरिक आकर्षण हेच अंतिम सत्य आहे का? लग्नाचे अधिकार नसताना आपलं समलैंगिक नातं कसं टिकवायचं? समाजाला, त्याच्या चुकीच्या प्रतिक्रियांना कसं तोंड द्यायचं असे अनेक कंगोरे भारद्वाजने त्याच्या वास्तववादी लिखाणातून हाताळले आहेत. हे करत असताना, पुस्तक खूपच उपदेशात्मक किंवा कंटाळवाणं होणार नाही, ह्याची त्याने पुरेपूर काळजी घेतली आहे. एलजीबीटीक्यू (LGBTQ) नातेसंबंधांचं सामान्यीकरण होण्याच्या दृष्टीने ह्या पुस्तकाची खूप मदत होऊ शकते; कारण मानवी भावनांचा कॅलिडोस्कोप सगळीकडे सारखाच आहे. एकटेपणा, कम्युनिटीमधले अंतर्गत हेवेदावे, लैंगिक आकर्षण आणि शारीरिक सुखाची वखवख, समलैंगिक जोडीदाराबरोबरची कमिटमेंट अशा चौफेर विषयांवर भारद्वाज त्याच्याशीच संवाद साधत असतो, ह्या लेखांमधून. एक वाचक म्हणून आपल्याला त्यामुळेच त्याच्याबरोबर कनेक्ट होता येतं. समीर समुद्र
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.