Ganam
Sanvarg By Rahul Nikam
Sanvarg By Rahul Nikam
Couldn't load pickup availability
कथाकार राहुल निकम यांची ‘संवर्ग’ या कथासंग्रहातील कथा राजकीय आणि सामाजिक सत्तासंघर्षात होरपळणार्या खानदेशी माणसांची कथा आहे.
गावगाड्याचे कपडे बदलले पण त्याचे विषमतारुग्ण मध्ययुगीन डोके त्याने बदलू दिले नाही.
बदललेले आणि बदल मान्य नसलेले हाच पायाभूत संघर्ष या कथेच्या केंद्रस्थानी आहे. या संघर्षाचे एकविसाव्या शतकातले विदारक वास्तव या कथेत मांडले गेले आहे.
सर्वच विकत घेणार्या आणि त्यासाठी सर्वच विकणार्या बेबंद सत्तेचे संविधानविरोधी आणि लोकशाहीविरोधी वर्तन या कथासंग्रहातील कथा चव्हाट्यावर मांडते.
ही कथा केवळच शोषणसत्ताकाने केलेली माणसांच्या डोक्यांची गोठवणूकच मांडत नाही, तर या गोठवणुकीचा पराभव करणारी आबा गुरुजींची पहाटही चितारते.
ही पहाट डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात घेतलेल्या शिक्षणाने गुरुजींच्या मस्तकाला बांधलेली आहे.
या प्रकारे शोषणसत्ताकाने लोकप्रिय केलेल्या विद्रूपीकरणाला ही कथा सममूल्यतेचा विधायक विकल्पही देते.
-डॉ. यशवंत मनोहर
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.