Ganam
Sanghatil Manavi Vyavasthapan Eka Swayamsevakachya Najaretun By Nitin Gadkari
Sanghatil Manavi Vyavasthapan Eka Swayamsevakachya Najaretun By Nitin Gadkari
Couldn't load pickup availability
रा. स्व. संघाच्या शाखांतून तयार झालेल्या स्वयंसेवकांनी आवडीची कार्यक्षेत्रे
निवडली. त्यात संघाच्या संस्कारबळावर विविध संस्थात्मक, संघटनात्मक कार्ये उभी
केली. शिक्षण, संस्कार, कामगार, विद्यार्थी, उद्योग, आरोग्य, राजनीती अशा क्षेत्रांत
आणि विविध सेवाकार्यांत संघस्वयंसेवकांनी कार्य केले आणि हाच शक्तिसाठा
‘संघपरिवार’ म्हणून ख्यातनाम झाला.
मंत्र छोटा, तंत्र सोपे । परि यशस्वी ठरले ते ।।
रीत साधी, शिस्त बांधी । कार्य व्यापक उभवी ते ।।
या संघगीताचा साक्षात्कार आज सार्या विश्वाला होत आहे. तरीही संघ समग्रपणे
समजला, असे म्हणता येईल का ? कारण रोज माझ्या अवतीभवती वावरणारा,
माझ्यासारखाच हा सामान्य माणूस, आश्चर्याने तोंडात बोट घालावे असे उत्तम कार्य
कसा करू शकला बुवा, हे मनात येतेच. या आश्चर्यावर मात करून संघातील मानवी
व्यवस्थापन बारकाईने न्याहाळले तर ‘सामान्य माणसातल्या असामान्य क्षमता फुलवून
मोठाली कामे करणारी संघटना म्हणजे रा. स्व. संघ’ हा बोध आपल्याला होतो.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.