Ganam
Sandeep Wasalekar 2 Pustkancha Sanch
Sandeep Wasalekar 2 Pustkancha Sanch
Couldn't load pickup availability
एका दिशेचा शोध
भारत-पाकिस्तान, भारत-चीन, इस्रायल-पॅलेस्टाइन असे
देशादेशांमधील संघर्ष. सार्या जगाला टांगत्या तलवारीसारखा
भेडसावणारा दहशतवाद. पर्यावरणाची हानी, त्यातून नजीकच्या
भविष्यात उभ्या राहणार्या अन्नधान्याच्या आणि पाण्याच्या गंभीर समस्या.
भारत आणि भारतासारख्या अनेक देशांपुढे उभे असलेले गरिबी, कुपोषण,
अनारोग्य, बेकारीचे प्रश्न. अशा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी
भारतातील सामान्य माणसाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी रस्ता
दाखवत आहे जागतिक स्तरावर कार्य करणारा एक विचारवंत.
जगातील पन्नास देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी सल्लामसलत करणार्या
संदीप वासलेकरांचे भारतीय युवकाला ध्येयदर्शन घडवणारे
युध्द नाकारणारे जग
युद्धाला द्यायला हवा ठाम नकार...
जगाला संघर्षांनी वेढलेले असताना युद्ध आणि शांतता यांचा सम्यक विचार
करणार्या या पुस्तकाचे महत्त्व अजोड आहे. संदीप वासलेकर हे आंतरराष्ट्रीय
कीर्तीचे विचारवंत, ऑक्सफर्डचे स्कॉलर आणि ‘एका दिशेचा शोध' या १३
वर्षांत २५ आवृत्त्या निघालेल्या राजहंसी पुस्तकाचे लेखक आहेत.
युद्धांमागील राजकारण, प्राणघातक शस्त्रास्त्रांच्या शर्यती, अतिरेकी राष्ट्रवादाचे
दुष्परिणाम यांचा उदाहरणांसह परखड उहापोह या पुस्तकात वाचायला मिळेल.
मानवी संस्कृती व सभ्यता यांच्या विनाशाची शक्यता संहारक युद्धांमुळे वाढत
चालली आहे, हे सत्य सुस्पष्टपणे मांडले आहे. सर्वनाश टाळायचा तर मानवी
समाजाने एकत्र येऊन आणि राजकीय नेत्यांना बाजूला ठेवून ठामपणे युद्धांना
नकार दिला पाहिजे, असा लेखकांचा निष्कर्ष आहे. त्यासाठी त्यांनी
आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान आणि इतिहास यांचा योग्य
परामर्श घेतला आहे.
युद्ध हा मानवजातीचा नैसर्गिक गुणधर्म नाही. शांतता व युद्ध यातून शांततेची
निवड करण्याची मुभा आपल्याला आहे, असे हे पुस्तक ठामपणे बजावते.
एकीकडे धोक्याचा इशारा आणि दुसरीकडे विचारांना चालना हे त्याचे वैशिष्ट्य.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.