Skip to product information
1 of 1

Ganam

Sahyadri Til Ghat Wada By Sushil dudhani

Sahyadri Til Ghat Wada By Sushil dudhani

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

 

सुशिल दुधाणे यांचे घाट वाटांवरचे हे दुसरे पुस्तक. अल्पावधीत असे पुस्तक निघणे, यातूनच लेखकाने या पुस्तकात वाटाड्या म्हणुन जी भूमिका घेतली आहे त्यांच्या महत्वाचे गमक आहे. १५-२० घाटांच्या खडतर प्रवासाच्या ट्रेकप्रमाणे किल्लेप्रेमींना परिसरातील किल्ले, डोंगर यांचीही वाट त्यांनी सोप्या भाषेत दाखवली आहे.

• आनंद पाळंदे

महाराष्ट्र म्हटलं की सह्याद्री अन सह्याद्री म्हटलं की महाराष्ट्र हे नातं तस जुनंच, याची ऊंची वाढती ते येथील घाट वाटांनी. याच वाटेवर प्राचीन काळात संस्कृतीच्या लेण्या कोरल्या गेल्या व पुढील काळात साम्राज्य रक्षणाच्या विस्ताराच्या दृष्टीने गडकोट उभे राहिले. सह्याद्री अनुभवायच तर येथील घाट वाटा समजून घेणे महत्त्वाचे ठरते. राजेशाही संपुष्टात आली तरी त्याच्या पाऊलखुणा समजून घेण्यासाठी सह्याद्रीचे भटके फिरत असतात, पाऊलखुणा धुंडाळत असतात. अश्याच भटक्यांपैकी एक नाव म्हणजे सुशिल दुधाणे. इतिहासाचा मागोवा घेत घेत प्राचीन वाटेवर फिरत शोधक नजरेतून सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर असणाऱ्या नवीन वाटांचा शोध लावणे, यातच रमणे हेच जगण्याचं ध्येय व उद्दीष्ट सुटीच्या दिवशी मौज मजा आराम सोडून हा माणूस भल्या पहाटे पहाटे सह्याद्रीत फिरस्त्या सारखं धावत असतो. भूक इतकी मोठी की स्वतःची तहान भूक विसरून नवीन वाटांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी पावणारा. नुकतेच ५० पेक्षाही अधिक घाट वाटांचा मागोवा घेणारा ग्रंथ प्रकाशित झाला. थांबतीत ते सह्याद्रीचे भटके कुठले. पुन्हा नव्या दमाने वाटा शोधून अल्पावधीतच दुसरा ग्रंथ सह्याद्री समोर येत आहे. आपल्या सारख्या सहाप्रेमीमुळे सह्याद्री खऱ्या अथनि महाराष्ट्राता समजेल यात शंकाच नाही. सुशित भाऊंना पुढील वाटचालीस सह्याद्री एवढ्या शुभेच्छा!

 

View full details