Skip to product information
1 of 1

Ganam

Sadebara Lakhanchi Khandani By Sanjay Sukhtankar

Sadebara Lakhanchi Khandani By Sanjay Sukhtankar

Regular price Rs. 350.00
Regular price Rs. 399.00 Sale price Rs. 350.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

कंपनीचा पेर्सोनेल मॅनेजर कथेचा नायक आहे. त्याच्याभोवती फिरणारे अनेक प्रसंग, तणावपूर्ण घटना यांतून कॉर्पोरेट विश्वातील घडामोडींची माहिती मिळते. कादंबरीत एक रंजकता असूनही सत्य घटनांवर ती आधारित असल्याने त्याचे संदर्भ सद्यस्थितीतही लागू होतात.
*मुंबईत, १९८०च्या दशकात कामगार चळवळीत राजकारणी तसेच सामाजिक अपप्रवृत्तींचा प्रवेश झाला. आणि कामगार संघटना आक्रमक झाल्या. त्यांच्याबरोबर काम करणे व्यवस्थापनांसाठी अतिशय अवघड बनले. तो संघर्ष कसा होता? याचे वर्णन यात वाचायला मिळते.
*एकमेकांचे खच्चीकरण करण्यासाठी सुरू असलेली चढाओढ, कामगार नेतृत्वाचे अपयश किंवा युनियनचा स्वार्थासाठी केला जाणारा वापर यांतून 'शह-काटशह'चा खेळ वाचकाला सुन्न करतो. *कॉर्पोरेट विश्वाची ओळख करून देताना या क्षेत्रातील अधिकाऱ्याच्या भाषेत कादंबरी लिहिली असल्याने तिचे कथानक वाचकाला भावते.
* सहज आणि ओघवत्या शैलीतील कादंबरीचे कथानक वाचकांच्या डोळ्यांसमोरून एखाद्या चित्रपटाप्रमाणे सरकत जाते. हे लेखकाच्या लेखनशैलीचे यश आहे.
* 'मॅनेजमेंट माफिया' ही याच विषयावरील पहिली कादंबरीही इतकीच वाचनीय आहे.

View full details