Ganam
RUKKI By MAHADEV MORE
RUKKI By MAHADEV MORE
Couldn't load pickup availability
‘रुक्की’ हा ग्रामीण कथासंग्रह. रुक्कीची गरिबी, बेरकी वातावरण व गावात छेडणारे टोळभैरव, या मुशीत रुक्की चांगलीच बदमाश बनते. सासरी ती नांदत नाही व वेश्या बनते. आक्रोश-विलाप-जीवघेणी तगमग हे सौंदर्यवती ‘आम्रपाली’च्या कथेतून जाणवते. ‘नगरवधू’ बनण्याच्या नीच प्रथेला आम्रपाली विरोध करते...तिचे तेजस्वी उत्तर स्त्री जातीचा स्वाभिमान,सन्मान उंचावते.‘नशीब’ कथेचं मूळही स्त्री-अहंकारातच दडलेलं. विकृतपणाने, सूडभावनेने पेटलेले लोक करमदीनचं व त्याच्या भाच्याचं जगणं मुश्किल करतात. त्याचा लाडका घोडा कापून काढतात;मात्र वैमनस्य संपतच नाही. ‘इगत’कथेतले महाबेरकी,संग्या-बाळ्या कुस्त्यांचा फड भरवायचा म्हणून सगळ्यांकडून पैसे लुंगाडतात व लुटलं...असं भासवून गावाला मूर्ख बनवतात. ‘झेंगाट’ कथेतून फ्याट गाडीसाठी ड्रायव्हर व देखण्या गब्रू जावयाचा शोध घेतला जातो. महादेव मोरे यांच्या प्रत्येक कथेतून ग्रामीण जीवनाचं नंबरी इगत(युक्ती) सुटतं. डोळ्यांत अंजन घालणार्या या कथा.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.